'गिरिजा'त विहिरी खोदण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:16 AM2017-12-15T01:16:36+5:302017-12-15T01:16:43+5:30

खुलताबाद तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात विहिरी खोदण्याचा शेतक-यांनी धडाका लावला आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना धमकावले जाते. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे.

 The excitement of digging wells in 'Girija' | 'गिरिजा'त विहिरी खोदण्याचा धडाका

'गिरिजा'त विहिरी खोदण्याचा धडाका

googlenewsNext

सुनील घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात विहिरी खोदण्याचा शेतक-यांनी धडाका लावला आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना धमकावले जाते. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे.
या जलाशयाची पाणीपातळी अतिशय जेमतेम असताना त्यातून सर्रास अवैधरित्या पाण्याचा उपसा परिसरातील शेतकरी करीत असून त्याचबरोबर मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात कुठलीही परवानगी नसताना अवैधरित्या विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे.
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना धमकी दिल्या जात आहेत.
या प्रकरणी पाटबंधारे विभागाने तहसील कार्यालयास याबाबत पत्रही दिले आहे.
खुलताबाद तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणारा येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला होता; परंतु परतीच्या पावसाने प्रकल्पात दीड ते दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
गिरिजा मध्यम प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या शेकडो विहिरी खोदून या विहिरीचे पाणी सर्रास शेतीसाठी वापरण्यात येत आहे. त्याच गिरिजा प्रकल्पात पाणी असल्यास प्रारंभी पाण्याचा उपसा करण्यात येतो, हे विशेष.
खुलताबादसह २० गावांना होतो पाणीपुरवठा
जेमतेम पाणीसाठा असलेल्या पाण्यावरही परिसरातील काही लोक अवैधरित्या विद्युत मोटारीद्वारे पाण्याची चोरी करीत असल्याने हा पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे खुलताबाद शहर व तालुक्यातील २० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मध्यम प्रकल्पात सध्या पाणी नसल्याने अनेक जणांनी प्रकल्पातच बेकायदेशीर विहिरी खोदण्याचे काम सुरू केले आहे. विहिरीचे काम थांबविण्यासाठी गेलेले पाटबंधारे सिंचन विभाग येसगाव शाखेच्या वतीने जलसंपदा विभागाचे पंकज शिंदे, व्ही. एस. शिंनगार, डी. एम. बनकर, संतोष व्यवहारे, पी. एस. गाडेकर, व्ही. के. दुलत यांनी २-३ वेळा सदरील काम रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमक्या देऊन हाकलून लावण्यात आले.

Web Title:  The excitement of digging wells in 'Girija'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.