जुने कायगावात गंगा प्रकटदिन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:46+5:302021-02-25T04:05:46+5:30
गोदावरी नदीला दक्षिणगंगा म्हणून संबोधले जाते. त्यामुळे गोदावरी नदीला मोठे धार्मिक महत्त्व आहे. यंदा जुने कायगावात गंगा प्रकटदिन सोहळ्याची ...
गोदावरी नदीला दक्षिणगंगा म्हणून संबोधले जाते. त्यामुळे गोदावरी नदीला मोठे धार्मिक महत्त्व आहे. यंदा जुने कायगावात गंगा प्रकटदिन सोहळ्याची महिनाभरापासून जय्यत तयारी सुरू होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आयोजकांनी प्रकटदिनासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरविले. त्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करून
मोजक्याच कार्यक्रमाने हा सोहळा साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रामेश्वर मंदिर संस्थानने गोदावरी नदीकाठी व रामेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई केली. गोदावरीच्या घाटावर सुद्धा दिवे लावून लखलखाट करण्यात आला. मोजक्याच भाविकांच्या उपस्थित गंगापूजन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी डॉ. जनार्धन मेटे महाराज, रामगड संस्थानचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज दिघे, रामकृष्ण भक्तीधाम आश्रमचे मठाधिपती दादा महाराज वायसळ, नागेबाबा संस्थानचे मठाधिपती मारुती महाराज जाधव, कायगावचे बजरंगदास महाराज, सप्तशृंगी मंदिराचे विजय महाराज खेडकर, रामेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ हजर होते.
फोटो :
जुने कायगाव येथील गोदाकाठी गंगा प्रकटदिनानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी दिवे लावून गंगापूजन केले. (वर्षा फोटो,कायगाव)
240221\tarekh ahemad usuf shaikh_img-20210224-wa0001_1.jpg
जुने कायगाव येथील गोदाकाठी गंगा प्रकटदिन निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी दिवे लावून गंगापूजन केले. (वर्षा फोटो,कायगाव)