स्पर्धा परीक्षेच्या माहितीने विद्यार्थ्यांत संचारला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:11 AM2018-02-12T00:11:24+5:302018-02-12T00:11:29+5:30
एनटीएसई, आॅलिम्पियाड, एनएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आपण इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे आहोत, याचा अंदाज येतो. केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशा शब्दांत आकाश इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक व आयआयटी दिल्लीच्या गणित विभागाचे अभिषेक सेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एनटीएसई, आॅलिम्पियाड, एनएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आपण इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे आहोत, याचा अंदाज येतो. केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशा शब्दांत आकाश इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक व आयआयटी दिल्लीच्या गणित विभागाचे अभिषेक सेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सेठ यांनी एनटीएसई आणि आॅलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आकाश इन्स्टिट्यूटचे केंद्र संचालक मंगेश असवर, ‘लोकमत’चे वितरणप्रमुख वसंत आवारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सेठ म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनीही लहानसहान अपयशांनी खचून जाऊ नये, असेही त्यांनी सुचविले. स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती देणारा हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक ठरल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेतील विजेते
दि. ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ‘लोकमत टॅलेंट हंट’ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.
इयत्ता आठवी-
प्रथम - नील बारके (लॅपटॉप)
द्वितीय- अक्षया श्रीधर (मोबाईल)
तृतीय- रितेश कोलते (सायकल)
इयत्ता नववी-
प्रथम- विराज रोडगे (लॅपटॉप)
द्वितीय- श्रीराम ढमढेरे (मोबाईल)
तृतीय- रशद अली बेग (सायकल)
इयत्ता दहावी
प्रथम- सुमित गिरनाळ (लॅपटॉप), द्वितीय- यश काबरा (मोबाईल), तृतीय- अपूर्व आनंद (सायकल)