तहान भागविण्यासाठी कसरत

By Admin | Published: June 3, 2016 11:41 PM2016-06-03T23:41:22+5:302016-06-03T23:51:55+5:30

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Exercise to fight thirst | तहान भागविण्यासाठी कसरत

तहान भागविण्यासाठी कसरत

googlenewsNext

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाळा लांबला तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. औरंगाबादकरांना भविष्यात आपली तहान भागविण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२०१२ मध्ये महापालिकेला अशाच पद्धतीने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून धरणाच्या मध्य भागातून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार करण्यात आला होता. ८५०-९०० मीटर लांब चॅनल तयार केला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने सध्या अ‍ॅप्रोच चॅनलद्वारे डाव्या कालव्यात पाणी आणण्यात येत आहे. कालव्यातील पाणीपातळीही दीड मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे महापालिकेने सहा इमर्जन्सी पंप सुरू करून एक स्वतंत्र विहीर तयार केली आहे. यामध्ये पाणी आणून शहराची तहान भागविण्यात येत आहे. धरणाचा परिसर पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. नाथसागराच्या मध्यभागीच मृतसाठा दिसून येत आहे. मृतसाठ्याची पाणीपातळी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने मनपाची चिंता वाढू लागली आहे. सध्या अ‍ॅप्रोच चॅनलमधून तीन ते चार फूट पाणीपातळी आहे. आणखी पंधरा ते वीस दिवस ही पाणीपातळी कायम राहील. १५ जूननंतरही पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अ‍ॅप्रोच चॅनलला आणखी खोल करणे सध्या मनपाला शक्य नाही. इमर्जन्सी पंपही एवढ्या लांब धरणात नेणे अशक्य आहे.
शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी धरणात जाऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता शिरसाट यांच्यासह औरंगाबाद वॉटर युटिलिटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत आणण्याची कसरत आणखी एक महिना होऊ शकते, असे मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले.

Web Title: Exercise to fight thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.