तरुणांनो व्यायाम करा, पोषक आहाराचे सेवन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:51 AM2017-09-29T00:51:44+5:302017-09-29T00:51:44+5:30

धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

 Exercise young people, eat nutritious food! | तरुणांनो व्यायाम करा, पोषक आहाराचे सेवन करा!

तरुणांनो व्यायाम करा, पोषक आहाराचे सेवन करा!

googlenewsNext

राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली, पोषक आहाराचा अभाव या समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
डॉ. सानप म्हणाले की, वाढते ताणतणाव, धकाधकीचे जीवन हृदयरोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कमी वयात हा आजार उद्भवत आहेत. या आजारापासून मृत्यू पावणाºयांची संख्या देशात सर्वाधिक आहे. युरोपपेक्षा दहा वर्षे अगोदर भारतीय लोकांना हा आजार होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. काही वर्षांपर्यंत संसर्गजन्य आजाराने मृत्यू होणाºयांची संख्या अधिक असायची. पण अलीकडच्या काळात हृदयरोग व इतर प्रकारचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात हृदयरोग रुग्णांची संख्या सारखीच आहे. भारतात दरवर्षी सुमारे १७.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू हृदयरोगामुळे होत आहे. म्हणजेच कर्करोग, मलेरिया अथवा एचआयव्हीची लागण होऊन मृत्यू पावणाºयांपेक्षा ही संख्या अधिक असल्याचे वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या पाहणीत आढळून आले आहे.
हृदयरोग आणि विकारांबाबत जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड हार्ट फेडरेशन दरवर्षी एक थीम घेऊन लोकांमध्ये जाते. यावर्षी ‘टेक अ‍ॅक्शन’ ही थीम घेण्यात आहे. या थीमनुसार आता कृती करण्याची वेळ आली असून, हृदयरोग आणि विकार दूर ठेवण्यासाठी लोकांनी व्यायाम व पोषक आहाराचे सेवन करण्यास प्राधान्य देण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असे डॉ. सानप म्हणाले. गरजेपेक्षा अधिक खाणे, व्यायामाचा अभाव, जंकफूड खाणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल ही प्रमुख कारणे हृदयरोग वा विकार उदभवण्याची आहेत. ‘फ्युएल युवर हार्ट, मूव्ह यूवर हार्ट, लव्ह युवर हार्ट अ‍ॅण्ड शेअर दि पॉवर’ या उक्तीनुसार तरुणांसह वृद्धांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर या रोगामुळे मृत्यू पावणाºयांची संख्या निश्चितच कमी होईल, यात शंका नाही, असेही सानप यांनी सांगितले. हार्ट अटॅक व इतर हृदयरोगामुळे भारतात मरण पावणाºया संख्या एक लाख लोकसंख्येमागे २७२ आहे. तर तीच जागतिक स्तरावर २३५ इतकी आहे. याचाच अर्थ भारतात या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असून, ही धोक्याची घंटा आहे. वेळीच सावरले नाही तर तरुणाचे भवितव्य अंधारात जाईल. म्हणूनच हृदय रोग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाय करणे अगत्याचे ठरणार असल्याचे सानप म्हणाले.

Web Title:  Exercise young people, eat nutritious food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.