पाणंद रस्त्याचा श्वास मोकळा करून डांबरीकरणानेच काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:22+5:302021-03-13T04:05:22+5:30
त्यांनी नुकतीच मोढा बु. गावाला भेट देत सदरील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हा पाणंद रस्ता पावसाळ्यात ...
त्यांनी नुकतीच मोढा बु. गावाला भेट देत सदरील रस्त्याच्या कामाची पाहणी केली.
हा पाणंद रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो. या रत्यावर अतिक्रमण झाले होते. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचा गुदमरलेला श्वास मोकळा करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. काही लोकांनी या रस्त्याचे काम रोखले होते. पावसाळ्यात या रस्त्याने चालणे मुश्कील असते. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन झालेले अतिक्रमण, टाकाऊ साहित्य, झाडेझुडपे काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सत्तार यांनी केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, आर. एस. पवार यांच्यासह सरपंच रामेश्वर सोनवणे, उपसरपंच दीपक हावळे, संभाजी हावळे, समाधान साळवे, सोसायटी चेअरमन राहुल सुरडकर, माजी सरपंच अशोक सुरडकर, राजू महाकाळ, तंटामुक्ती अध्यक्ष निवास महाकाळ आदींची उपस्थिती होती.