भविष्य निर्वाह निधी थकवला; कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:04 AM2021-06-17T04:04:01+5:302021-06-17T04:04:01+5:30
:दोघा कंपनी मालकाविरुध्द गुन्हा दाखल वाळूज महानगर : कामगारांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निधी संघटन ...
:दोघा कंपनी मालकाविरुध्द गुन्हा दाखल
वाळूज महानगर : कामगारांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निधी संघटन कार्यालयात न भरणाऱ्या वाळूज एमआयडीसीतील मनीषा इंटरप्रायजेस या कंपनीच्या दोघा मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा नितीन तांबे व किरण साईनाथ तांबे या दोघांनी कंपनीत काम करणाऱ्या ८४ कामगारांच्या वेतनातून सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली. मात्र, कपात केलेली ११ लाख ३७ हजार ३८२ रुपये एवढी रक्कम अंशदानासह भविष्य निधी संघटन कार्यालयात जमा केलेली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भविष्य निधी कार्यालयाकडून कंपनीला २३ फेब्रुवारी २०२१ रोजी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, या नोटीसकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने भविष्य निधी संघटन कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी मुक्तेश्वर व्यास यांच्या तक्रारीवरून कंपनीच्या मालकांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.