मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा विस्तार अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:52 PM2017-12-28T23:52:53+5:302017-12-28T23:52:57+5:30

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा आगामी काळात विस्तार होऊन मोठ्या रेल्वेस्टेशनप्रमाणे विस्तार आणि विकास करणे अशक्य होणार आहे. सुविधा देण्यासाठी जागाच नसल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जात आहे

 Expansion of Mukundwadi railway station is impossible | मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा विस्तार अशक्य

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा विस्तार अशक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा आगामी काळात विस्तार होऊन मोठ्या रेल्वेस्टेशनप्रमाणे विस्तार आणि विकास करणे अशक्य होणार आहे. सुविधा देण्यासाठी जागाच नसल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे यापुढील काळात जागेअभावी हे रेल्वेस्टेशन ‘जैसे थे’ राहणार असून, रेल्वेना थांबा आणि मोजक्या सुविधांवर प्रवाशांना समाधान मानावे लागणार आहे.
१९९६ मध्ये पूजन झाल्यानंतर २००० मध्ये हे मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पूर्णत्वास आले. ९ जानेवारी २००० रोजी हे हॉल्ट स्टेशन सुरू झाले. सिडको, हडको, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, ठाकरेनगरसह लगतच्या ५ ते ६ लाख नागरिकांच्या सुविधेसाठी हे रेल्वेस्टेशन सुरू करण्यात आले. पूर्वी या भागातील नागरिकांना मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असत. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळाली; परंतु अपुºया सोयी-सुविधांमुळे गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली.
या रेल्वेस्टेशनचा मार्च २०१५ मध्ये ‘डी’ दर्जाच्या स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘डी’ वर्गातील स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी याठिकाणी सुरू असलेली बुकिंग कक्ष, वेटिंग हॉल यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ही कामे महिनाभरात पूर्ण होतील; परंतु त्यानंतर आगामी अनेक वर्षे रेल्वेस्टेशनवर विकास कामे होणे अवघड दिसते. त्यासाठी जागेचे कारण सांगितले जात आहे.
रेल्वेस्टेशनला लागून वसाहती
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या आहेत. आगामी काळात एक्स्प्रेस रेल्वेना थांबा मिळाल्यास स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढेल; परंतु जागेअभावी प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहन पार्किंग, एटीएम, मोठे प्रतीक्षालय अशा सुविधा देण्यास अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते.
जबाबदारी घेऊ शकणार नाही
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनची पाहणी केली. येथील विकासकामे महिनाभरात पूर्ण क रण्याची सूचना त्यांनी केली. रेल्वेस्टेशनवर पाहणी करताना जागेची अडचण त्यांच्या निदर्शनास आली. रेल्वेची जागा कमी आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म संपताच रेल्वेची जागा संपते. या परिस्थितीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्यास टॅक्सी स्टँडसह अन्य सुविधा देण्यासाठी रेल्वे जबाबदारी घेऊ शकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुकुंदवाडी स्टेशनची स्थिती
४ये-जा करणाºया १५ पॅसेंजर थांबतात.
४ दररोज सुमारे ३५ हजार रुपयांची तिकीट विक्री.
४केवळ मराठवाडा एक्स्प्रेसला थांबा.
४जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेससह अन्य एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी.

Web Title:  Expansion of Mukundwadi railway station is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.