राज्य मंत्रिमंडळ विस्तार यथावकाश
By Admin | Published: June 15, 2016 11:52 PM2016-06-15T23:52:09+5:302016-06-16T00:14:14+5:30
औरंगाबाद : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार यथावकाश होणार असल्याचे खा.रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
औरंगाबाद : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार यथावकाश होणार असल्याचे खा.रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच माझा भोकरदन येथील बंगला स्वत:च्याच जागेत असून, आरोप करणाऱ्यांनी चिल्लर आरोप केले आहेत. विधानसभेत पराभव पत्करावा लागल्यामुळे तोल गेल्यासारखे ते बोलत असून, जसे माजी मंत्री खडसे यांच्या बाबतीत आरोप झाले, तसे आरोप करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. त्यामुळेच विरोधकांनी आरोप केल्याचे खा.दानवे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आ.समीर कुणावार यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान योजना’चे सादरीकरण केल्यानंतर खा.दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला.
गेल्या आठवड्यात माजी आ.चंद्रकांत दानवे यांनी खा. दानवे यांचा बंगला आरक्षित भूखंडावर असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर बुधवारी खा.दानवे यांना पत्रकारांनी प्रश्न केल्यावर त्यांनी संतापून उत्तर दिले.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे राज्याचे महसूलमंत्री व इतर खाती सध्या रिक्त आहेत.
त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होणार काय? या प्रश्नावर त्यांनी ‘तुमच्या तोंडात साखर पडो’ असे वक्तव्य करून पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.
१९५३ साली माझ्या वडिलांनी सोसायटीमध्ये ते घर घेतले. कालांतराने अनेकांनी प्लॉट विकले, त्यातील काही प्लॉट आम्ही घेतले आणि घर बांधले. घराच्या परिसरात वृक्षारोपण केले.
२००२ पासून त्या बंगल्यावरून वाद सुरू आहे. विरोधक आरोप करतात; परंतु सगळी कागदपत्रे सादर केलेले असताना पुन्हा-पुन्हा तो विषय काढण्यात काहीही मजा नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.