शहराच्या विकासात क्रेडाईकडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:04 AM2021-04-14T04:04:41+5:302021-04-14T04:04:41+5:30

औरंगाबाद : कोरोनाने उद्‌भवलेल्या परिस्थितीवर आपण लवकरच मात करू. त्यानंतर शहर व आर्थिक पातळीवर विकासाचे इंजिन म्हणून बांधकाम व्यावसायिकांची ...

Expectations from Credai in the development of the city | शहराच्या विकासात क्रेडाईकडून अपेक्षा

शहराच्या विकासात क्रेडाईकडून अपेक्षा

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाने उद्‌भवलेल्या परिस्थितीवर आपण लवकरच मात करू. त्यानंतर शहर व आर्थिक पातळीवर विकासाचे इंजिन म्हणून बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ महत्त्वाची भूमिका निभावेल, असे प्रतिपादन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी येथे व्यक्त केले.

कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक रवीकुमार वर्मा, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष (इलेक्ट) प्रमोद खैरनार, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जाबिंदा, देवानंद कोटगिरे आदींची ऑनलाइन उपस्थिती होती.

यावेळी राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी अध्यक्ष नरेंद्रसिंग जाबिंदा, सचिव सुनील बेदमुथा, तसेच उपाध्यक्ष विकास चौधरी यांनी मागील दोन वर्षांचा अहवाल सादर केला. मावळत्या कार्यकारिणीने नूतन कार्यकारिणीकडे पदाची सूत्रे मानदंडाच्या स्वरूपात सोपविली.

पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले की, शहरात आता ७० मीटर उंचीच्या इमारती बांधण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहतील व सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे उपलब्ध होतील. घरांच्या मागणीला आता मोठा वेग येत असून, सर्वसामान्यांना घर खरेदी सुलभ व्हावी याकरिता शासनाने सुरू केलेल्या प्रोत्साहनपर योजना पुढेही सुरू ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी रवीकुमार वर्मा यांच्यासह महाराष्ट्र क्रेडाईच्या सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रेडाईचे सचिव अखिल खन्ना यांनी आभार मानले.

चौकट

क्रेडाईतर्फे घोषणा

* बांधकाम कामगारांचे लवकरच क्रेडाईतर्फे मोफत लसीकरण करणार.

* येत्या दोन वर्षांत शहरातील सर्व प्रवेश मार्गांवर स्वागत कमानी उभारणार.

* शहरातील विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणार.

* मनपाच्या सहकार्याने विविध चौकांचे सुशोभीकरण करणार.

Web Title: Expectations from Credai in the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.