एमआयएममधून पक्षात आलेल्या दोन माजी नगरसेवकांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:22 PM2021-11-18T14:22:29+5:302021-11-18T14:23:10+5:30

NCP: मागील दीड ते दोन वर्षांपासून हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर वावरताना दिसून आले.

Expel two former corporators who came from MIM; Demand of NCP city president | एमआयएममधून पक्षात आलेल्या दोन माजी नगरसेवकांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची मागणी

एमआयएममधून पक्षात आलेल्या दोन माजी नगरसेवकांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : एमआयएम पक्षातील दोन माजी नगरसेवक कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा इतिहास माहीत असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. आता त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारणांमुळे पक्षाची खूप बदनामी होऊ लागली. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष विजय साळवे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे एका पत्राद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था खूप काही समाधानकारक नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने दोन वर्षांपासून जोरदार इनकमिंग सुरू केले. २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच माजी नगरसेवकांना अगोदर पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यांच्या वॉर्डांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. प्रत्यक्षात हा निधी आजपर्यंत त्यांना मिळाला नाही. त्यामुळे हे नगरसेवक आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत पक्षात राहतील की नाही, यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक सय्यद मतीन आणि शेख जफर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. 

मागील दीड ते दोन वर्षांपासून हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर वावरताना दिसून आले. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया माहीत असतानाही पक्षाने त्यांना मानाचे स्थान दिले. आता हे दोन्ही नगरसेवक पक्षाला नकोसे झाले आहेत. चार दिवसांपूर्वीच मतीन यांच्या भावाच्या गाडीत नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक करण्यात आली, तर जफर हा सध्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हर्सूल कारागृहात आहे. या दोन्ही नगरसेवकांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत असल्यामुळे दोन्ही नगरसेवकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष विजय साळवे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

Web Title: Expel two former corporators who came from MIM; Demand of NCP city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.