महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:07 PM2018-12-11T23:07:12+5:302018-12-11T23:07:25+5:30
महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते नांदेडदरम्यान पाहणी आणि विविध कामांचे उद््घाटन करणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबादरेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली.
नगरसोल ते नांदेडदरम्यान रेल्वेस्टेशन, संरक्षक भिंत, पादचारी पूल, सिग्नल, रंगकामासह इतर कामांवर चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावा रेल्वे संघटनांच्या पदाधिकाºयांनी केला.
‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. त्यांच्या दौºयामुळे मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रूपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयानिमित्त पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई पाहायला मिळाली. दौरा एक दिवसावर आला तरी रेल्वेस्टेशनवर कामांचा धडाका सुरूच होता. रेल्वेस्टेशनच्या इमारतीवर ठिकठिकाणी अजिंठा लेणीतील चित्र साकारण्याचे काम मंगळवारी सुरू होते. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोरील इंजिनचे रंगकाम आणि सौंदर्यीकरणाचेही काम सुरू होते. दौºयामुळे रेल्वेस्टेशन चकाचक झाले आहे. त्यामुळे आता महाव्यवस्थापक चकाचक रेल्वेस्टेशनची पाहणी करणार आहेत.
रेल्वेस्टेशनवर कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. तरीही पाहणी करताना महाव्यवस्थापक कोणत्या त्रुटी उघड करणार, याकडे लक्ष लागले आहे.
अनावश्यक कामे
दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर विविध कामांवर चार कोटींचा खर्च झाल्याची माहिती अधिकारातून मिळाली आहे. रेल्वेस्टेशनवर इतकी कामे केली असती तर नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी कधी केलीच नसती. चांगल्या फरशा असतानाही बदल्यात आल्या, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे राजकुमार सोमाणी म्हणाले.
९ कोटी रुपये खर्चून मॉडेल रेल्वेस्टेशनची इमारत बनविण्यात आली. निरीक्षणाच्या नावाखाली पुन्हा खर्च करण्यात आला. दौºयासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला; परंतु पीटलाईनसाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. रेल्वेस्टेशनवर दिलेला रंग हा ‘डी’ वर्गातील आहे. त्यामुळे पावसात हा रंग निघून जाईल. गरज नसताना फरशा बदलण्यात आल्या. जुन्या इमारतीतील कोनशिलाही काढण्यात आल्याचा आरोप रेल्वे संघटनांतून होत आहे.