महागडे श्वान पाळण्याची क्रेझ, पण लाडक्या टॉमीचा महिन्याचा खर्च किती?
By साहेबराव हिवराळे | Published: September 29, 2023 07:10 PM2023-09-29T19:10:47+5:302023-09-29T19:11:11+5:30
महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यक
छत्रपती संभाजीनगर : पाळीव कुत्र्यावर महिन्याला साधारणपणे खाद्य, आरोग्य लस, शेव्हिंग, कापड, स्नानासाठी लागणारे साहित्य, केअर टेकर आणि विविध लसी, असा एकूण लाखाच्या घरात विदेशी पाळीव श्वानावर खर्च करावा लागतो. शहराची लाइफ स्टाइल उंचावलेली असल्याने सर्वात महागडे श्वान पाळणे ही आता क्रेझ आली आहे. एवढेच नव्हे तो नाराज असेल, तर त्याला खेळण्यासाठी खेळणी देखील आणून द्याव्या लागतात. पाळीव टॉमीवर जेवढा खर्च कराल तेवढा कमीच आहे.
महिन्याचा खर्च किती?
शहरात ३० प्रजातीचे श्वान पाळले जातात
शहरात कॅव्हेलिअर किंग चार्ल्स स्पॅनियल्स, चीनचा चाऊ चाऊ, यॉर्क शिरे टेरीअर, बेल्जिअम, डॉबरमॅन, पामोलियन, जर्मन सेफर्ड, फ्रेन्च मॅस्टीक, इंग्लिश बुलडॉग यासह ३० प्रजातींचे विदेशी श्वान आढळून येतात. त्यांचे डोस, सफाईपासून ते खाद्यपदार्थांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार देखभाल करावी लागते. दवाखान्याचा खर्च त्याच्या प्रकृतीनुसार ठरलेला असतो.
- डॉ. नीलेश जाधव
सांभाळायचा खर्च
एवढेच नव्हे तर त्याच्यावर होणारा बराच खर्च, सांभाळण्यासाठी केअर टेकरसह खर्च सांगून मोकळे होतात. पण देशी कुत्र्याला कुणी जीव लावत नसल्याची खंत श्वानप्रेमी जयेश शिंदे यांनी व्यक्त केली.
मोठा खर्च कशाचा?
वार्षिक खर्चात खाद्य, औषधी, लसीकरण, केअर टेकर, इतर सर्व खर्च पाहता लहान श्वान ३० हजार ते अर्धा लाख आणि मोठ्या श्वानाला लाख ते सव्वालाखापर्यंत किंवा अधिकही खर्च होतो. श्वानाच्या वेगवेगळ्या प्रजातीचा यात समावेश आहे.
खाद्य : २ ते ५ हजार महिन्याला
औषधीपाणी : १२००० रुपये वर्षाला जाऊ शकतो, त्याच्या आजारावर अवलंबून आहे.
महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यक
खाद्य, आरोग्य लस, सेविंग, कापड, स्नानासाठी लागणारे साहित्य, केअर टेकर आणि विविध लस असा एकूण लाखाच्या घरात विदेशी पाळीव श्वानावर खर्च कुटुंबाला करावा लागतो. महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यक हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये, असा श्वान पालकांना सल्ला द्यावा लागतो.
- पशुवैद्यक, डॉ. नीतीसिंह चौहान