एक्स्प्रेसवेबाबत संवाद बैठक
By Admin | Published: August 28, 2016 12:05 AM2016-08-28T00:05:42+5:302016-08-28T00:17:08+5:30
बदनापूर : तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेबाबत शासनाच्या धोरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
बदनापूर : तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेबाबत शासनाच्या धोरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
बदनापूर येथे शनिवारी पं.स. सभागृहात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामधे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पॉवर प्रझेंटेशनच्या माध्यमातून मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे बाबतची माहिती दिली. या प्रकल्पाची निर्मिती,या प्रकल्पामुळे या भागाचा होणारा विकास या प्रकल्पाबाबतची शासनाची भूमिका व धोरण जमीन संपादन प्रक्रिया शेतरक्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, मावेजा आदी मुद्यांची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची नोंद घेऊन याबाबत शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. यावेळी कृति समितीचे भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, प्रशांत वाढेकर, प्र्रशांत गाढे आदींनी शेतकऱ्यांना पाचपट मावेजा एकरकमी द्या, विकासातील ३० टक्के जागा द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले.
पद्माकर पडूळ, राजू गुसिंगे, उदय काकडे, शिवाजी दराडे, उध्दव गिते, काकासाहेब नाईकवाडे, कान्हेरे आदींनी या प्रकल्पाबाबत विविध प्रश्न विचारले. प्रकल्पासाठी खुणा करताना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.