ग्रामीण भागात वेचला जास्तीचा प्लास्टिक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:16 AM2017-12-05T00:16:26+5:302017-12-05T00:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय कर्मचाºयांनी २७ नोव्हेंबर रोजी विभागात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रामीण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय कर्मचाºयांनी २७ नोव्हेंबर रोजी विभागात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रामीण भागात ५८ हजार ५४७ किलोग्रॅम कचरा संकलित करण्यात आला आहे. तर शहरी भागामध्ये १४ हजार १७५ किलोग्रॅम कच-याचे संकलन झाले. विभागात ७२ हजार ७२३ किलोग्रॅम कचरा संकलन झाल्याची आकडेवारी विभागीय प्रशासनाने प्रसिद्धीस दिली आहे.
२५ व २६ नोव्हेंबर रोजी शासकीय सुटी असल्यामुळे या मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही. ७ डिसेंबर रोजी पूर्ण मराठवाड्यात ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, विभागीय आयुक्तांनी पूर्ण विभागाला सूचना केल्या आहेत.
६ हजार ६४२ ग्रामपंचायती आणि ७५ नगरपालिका हद्दीमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. नांदेडमध्ये सर्वाधिक २५ हजार ४९१ किलोग्रॅम कचरा संकलित झाला तर त्याखालोखाल १० हजार २८६ किलोग्रॅम कचरा सरकारी कर्मचाºयांनी वेचला आहे.