एसटी महामंडळात पैशांची उधळपट्टी, चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:30 PM2019-01-07T23:30:10+5:302019-01-07T23:30:29+5:30
एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबाद : एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
एसटी महामंडळातील कर्मचाºयांचा गणवेश गेली अनेक वर्षे एकसारखा होता; परंतु कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार गणवेश करून कोणाचे तरी हित जोपसण्यात आले. आजपर्यंत गणवेशावर १३ कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च आता ७५ कोटींवर गेला. साफसफाईचा खर्चही ५० कोटींवरून ४४७ कोटींवर गेला. खाजगी मालकीच्या सातशे शिवशाही बस घेण्यात आल्या. पुन्हा ४०० बसची आॅर्डर देण्यात आली आहे. सध्या ७८ स्लीपर बस आलेल्या आहेत. दुप्पट दरामुळे तोटा होत आहे. त्यामुळे या बस उभ्या करून ठेवल्या तरी परवडतील, असे तिगोटे म्हणाले.
एसटी महामंडळाचा संचित तोटा ३ हजार ६०० कोटींवर गेला आहे. दरवर्षी ५०० कोटींचा तोटा वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत एकाही चेसिसची खरेदी झाली नाही. त्यामुळे बसेस स्कॅ्रप होण्याचे प्रमाण वाढले असून, ‘लालपरी’ची ओळख धोक्यात आली आहे. ७ हजार ९०० कोटींचे उत्पन्न असलेल्या एसटी महामंडळाचा वार्र्षिक खर्च ८ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयाची, कामांची आणि खर्चाची चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी,अशी मागणी मुकेश तिगोटे यांनी केली. यावेळी सचिन सिरसाट, गिरीश गडप्पा, निसार पठाण, दत्तात्रय कातार आदी उपस्थित होते.
किमान सहा हजारांची वाढ
एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन दिले पाहिजे. १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात तफावत निर्माण झाली आहे. किमान सहा हजार रुपये वाढले, तर ही तफावत दूर होईल. ही वेतनवाढ देण्यात यावी, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मुकेश तिगोटे म्हणाले.