आमदार सावे यांना फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:46 PM2018-06-24T22:46:25+5:302018-06-24T22:46:52+5:30
पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली
औरंगाबाद - पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणा-या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.
संभाजी भोसले (३८, रा. सिडको), असे धमकी देणा-या व्यक्तीचे नाव आहे. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. सिनगारे म्हणाले की, आरोपी भोसले याने २३ जून रोजी सायंकाळी ६.३८ वाजता फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्याने ‘मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. जे फक्त ब्राह्मणांना प्रोटेक्शन देत आहे. थांबू शकत असाल तर मला थांबवा...’ असा मजकूर आहे. एवढेच नव्हे, तर भोसले याने अतुल सावे यांना अश्लील शिवीगाळ करणारी आणखी एक पोस्ट टाकली. या पोस्टला पाच जणांनी लाईक केले आणि चार जणांनी त्यावर कमेंट टाकली. कमेंटस् टाकणाºयांशी संगनमत करून ही धमकी दिल्याचे आ. सावे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफ डकी कारवाई करून आरोपी भोसले याला अटक केली. अश्लील शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि आय.टी. अॅक्टनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल के ल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.