फेसबुक फ्रेंड ‘त्या’ चौघांची माणुसकीची दिवाळी

By Admin | Published: November 14, 2015 12:39 AM2015-11-14T00:39:51+5:302015-11-14T00:53:16+5:30

सिल्लोड : फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरील ‘ड्रॉट हेल्प ग्रुप’ गटाचे सदस्य असलेले रूपेश पाटील, वैशाली चव्हाण (पुणे),

Facebook Friend 'That' Humanity's Diwali Diwali | फेसबुक फ्रेंड ‘त्या’ चौघांची माणुसकीची दिवाळी

फेसबुक फ्रेंड ‘त्या’ चौघांची माणुसकीची दिवाळी

googlenewsNext


सिल्लोड : फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरील ‘ड्रॉट हेल्प ग्रुप’ गटाचे सदस्य असलेले रूपेश पाटील, वैशाली चव्हाण (पुणे), क्रांती भूषण (जालना ) आणि माणिकनगर येथील संतोष बोराडे या चार सदस्यांनी जमा केलेल्या मदतीतून चिंचखेडा (ता. सिल्लोड) येथील बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला मदत करून माणुसकीची दिवाळी साजरी केल्याचा प्रत्यय दिला.
विष्णू अमृता गावंडे या जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची सामाजिक कार्यकर्ते संतोष बोराडे यांनी बुधवारी सकाळी भेट घेतली.
गावंडे यांची आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांना दीपावलीनिमित्त नवीन कपडे, मिठाई, एका महिन्याचा किराणा, धान्य आदी साहित्य कलावती बोराडे यांच्या हस्ते घरी जाऊन दिले. याप्रसंगी चिंचखेड्याचे सरपंच डॉ. विठ्ठल बकले, शिवाजी गावंडे, परसराम फरकाडे, ग्रामपंचायत सदस्य विलास फरकाडे, बाजीराव नाकिरे, बुढाजी बकले, ज्ञानेश्वर काकडे, सुनील बोराडे, गंगाधर गावंडे, रूपचंद वाणी, दत्ता तुपे, अमृता गाढे, सुनील शेंडेसह असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. तसेच भवन (माणिकनगर) येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कलावती बोराडे यांनी सदर शेतमजुराच्या इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीस दहावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत दत्तक घेण्याचे वचन दिले.

Web Title: Facebook Friend 'That' Humanity's Diwali Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.