पालिकेच्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा

By Admin | Published: August 19, 2016 12:38 AM2016-08-19T00:38:01+5:302016-08-19T00:58:38+5:30

जालना : नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा आहे. डॉक्टरांच्या रिक्त जागा तसेच औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे

Facilities in the health centers of the Municipal Corporation | पालिकेच्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा

पालिकेच्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा

googlenewsNext


जालना : नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा आहे. डॉक्टरांच्या रिक्त जागा तसेच औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. पाणीवेस आरोग्य केंद्र वगळता इतर दोन केंद्राची अवस्था बिकट आहे.
नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात पाणीवेस, नूतन वसाहत, बुऱ्हाणनगर येथे आरोग्य केंद्र चालविले जाते. या सर्वच रुग्णालयात आयर्न, कॅल्शिअम आदी औषधींचा तुटवडा आहे. पाणीवेस भागातील केंद्राची नवीन इमारत आहे. मात्र, नूतन वसाहत व बुऱ्हाणनगर येथील इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. येथे सुविधांचा अभाव आहे. डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने सर्वच केंद्रांत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागते. डॉ. सानप या पाणीवेस येथील केंद्रात रुग्णसेवा देतात. त्यामुळे इतर ठिकाणी सेवा कोलमडत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना अल्पदरात सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य केंद्र चालविण्यात येते. मात्र आज रोजी तीनही दवाखान्यांमध्ये सुविधांची वानवा आहे. रिक्तपदांमुळे रुग्णांवर उपचार होणे जिकिरीचे झाले आहे. गरीब रुग्णांना आपल्या परिसरात स्वस्तदरात उपचार मिळावेत म्हणून नगर पालिकेचे आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावत होते. गत काही वर्षांपासून ही केंद्रे शोभेची वस्तू बनली आहेत.
या केंद्रांत जिल्हा रुग्णालयाकडून वेळेत औषधी पुरवठा होत नाही. काही औषधी मुंबई येथून येतात. इतर औषधी उपलब्ध असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Facilities in the health centers of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.