कर्तव्यात कसूर, घाणेगाव ग्रामपंचायतीला नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:50 PM2019-08-29T23:50:37+5:302019-08-29T23:50:47+5:30
एका कंपनीकडून थकित कराची वसुली न करणाºया घाणेगाव ग्रामपंचायतीला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वाळूज महानगर: विभागीय आयुक्तांनी आदेश देवूनही एका कंपनीकडून थकित कराची वसुली न करणाºया घाणेगाव ग्रामपंचायतीला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या नोटिसीमुळे ग्रामविकास अधिकारी व सरपंच अडचणीत आले आहेत.
वाळूज उद्योगनगरीतील घाणेगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गुड ईअर कंपनीला ग्रामपंचायतीने १ कोटी १० लाख २०० रुपयांची कर आकारणी केली आहे. सदरील कराची रक्कम दंड व व्याजासह वसूल करावी, अशी मागणी सोपान सातपुते यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.
या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी संबंधित कंपनीकडून कर वसुली करावी असे ग्रामपंचायतीला आदेशित केले होते. मात्र याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करुन संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही.
थकीत कर वसूल न केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आणि गाव विकासावर परिणाम झाला. याची गंभीर दखल घेत जि.प. अध्यक्ष पवनीत कौर यांनी कारवाईचा बडगा उगारत थेट कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटिसा बजावली आहे.