कर्जमाफी अर्ज आॅनलाइन भरण्यात जालना आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:44 AM2017-08-29T00:44:48+5:302017-08-29T00:44:48+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे

Failure to fill the loan application online is the lead | कर्जमाफी अर्ज आॅनलाइन भरण्यात जालना आघाडीवर

कर्जमाफी अर्ज आॅनलाइन भरण्यात जालना आघाडीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. उर्वरित शेतकºयांचे अर्ज प्रशासनाने तातडीने भरून या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले.
पालकमंत्र्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आॅनलाईन अर्ज भरणे, स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार अभियान, पीकविमा, वृक्ष लागवड याबाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा पात्र शेतकºयांना लाभ व्हावा यासाठी शेतकºयांकडून आनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लाख १८ शेतकºयांपैकी एक लाख ८१ हजार ९८१ शेतकºयांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. यापैकी एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यात आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याने आतापर्यंत एक लाख ४५ हजार, परभणी जिल्ह्यात ६६ हजार, हिंगोली ६९ हजार, बीडमध्ये १ लाख १६ हजार, नांदेड एक लाख ३४ हजार, लातूर १ लाख ४२ हजार व उस्मानाबाद जिल्ह्याने १ लाख १ हजार शेकºयांचे अर्ज आॅनलाइन अपलोड केले आहेत. उर्वरित शेतकºयांचे अर्ज तातडीने आॅनलाईन अपलोड करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी वैयक्तिक लक्ष देऊन समन्वयाने काम करावे, अशा सूचना लोणीकर यांनी दिल्या.
जलयुक्त शिवार अभियान व स्वच्छता अभियानाच्या कामास गती देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची उपस्थिती होती.

Web Title: Failure to fill the loan application online is the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.