परिपत्रकावरुन कामगार संघटनामध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:38 PM2017-08-17T23:38:31+5:302017-08-17T23:38:31+5:30
महावितरणच्या कामगार संघटना पदाधिकाºयांनी भेटीपूर्वी परवानगी घ्यावी तसेच त्याबाबतचा पुरावा सादर करावा, असे परिपत्रक नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी काढले आहे. या परिपत्रकावरुन कर्मचारी संघटनामध्ये रोष निर्माण झाला असून हे परिपत्रक तत्काळ रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष प्रकाश वागरे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महावितरणच्या कामगार संघटना पदाधिकाºयांनी भेटीपूर्वी परवानगी घ्यावी तसेच त्याबाबतचा पुरावा सादर करावा, असे परिपत्रक नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी काढले आहे. या परिपत्रकावरुन कर्मचारी संघटनामध्ये रोष निर्माण झाला असून हे परिपत्रक तत्काळ रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष प्रकाश वागरे यांनी केले आहे.
नांदेड परिमंडळाच्या मुख्याधिकाºयांनी संघटना पदाधिकाºयांनी भेटीपूर्वी परवानगी घेणेबाबतचे एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात संघटनेचा तसेच पदाधिकारी असल्याचा पुरावाही सादर करावा, असेही नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्युत कामगार संघटना संतप्त झाले आहेत. हे परिपत्रक ट्रेड युनियन अॅक्ट व औद्योगिक विवाद अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
हे परिपत्रक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष वागरे यांनी दिला आहे.