पाणी वापराचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:57 AM2018-09-13T00:57:54+5:302018-09-13T00:58:17+5:30

जायकवाडी धरणातील पाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

Failure to use water | पाणी वापराचे फेरनियोजन

पाणी वापराचे फेरनियोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.
पैठण तालुक्यात १९७६ मध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण झाले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या १९८५ च्या फेरनियोजनानुसार सुधारित ताळेबंदास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार २६१८.५९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातील मागील ४२ वर्षांतील प्रत्यक्ष पाणी वापर पाहता मूळ प्रकल्पातील पाणी वापर तरतूद आणि प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झाला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करण्यात आलेले आहे. ताळेबंदात गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाºयांमुळे पैठण उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात घट झाली आहे. मूळ प्रकल्पीय बाष्पीभवनाच्या तरतुदीपेक्षा कमी बाष्पीभवन होत असल्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. माजलगाव धरणात सोडण्यात येणा-या पाण्यातही घट करण्यात आली आहे, तर घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. जलाशयावरून शासकीय उपसा सिंचन योजनांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Failure to use water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.