निकालात घसरण

By Admin | Published: June 18, 2014 01:10 AM2014-06-18T01:10:22+5:302014-06-18T01:26:34+5:30

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा परभणी जिल्ह्याची मोठी घसरण झाली

Fall to the exit | निकालात घसरण

निकालात घसरण

googlenewsNext

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा परभणी जिल्ह्याची मोठी घसरण झाली असून, विभागात परभणी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ७९.१६ टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील ३७५ शाळांमधून २२ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३ हजार १९० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, प्रथम श्रेणीत ६ हजार १६५, द्वितीय श्रेणीत ६ हजार ९४३ तर १ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले.
औरंगाबाद विभागाचा निकाल ८७.०६ टक्के लागला असून, ९१.८८ टक्के निकालासह बीड जिल्हा अव्वल ठरला आहे. त्याखालोखाल जालना जिल्ह्याचा ८८.४५, औरंगाबाद जिल्ह्याचा ८८.१४, हिंगोली जिल्ह्याचा ८०.८३ टक्के आणि परभणी जिल्ह्याचा निकाल ७९.१६ टक्के लागला. (प्रतिनिधी)
आइचे नाव अनिवार्य...
यावर्षी प्रथमच निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाबरोबरच परीक्षार्थ्याच्या आईचे नाव नोंदवावे लागले. आईचे नावाशिवाय निकाल पाहता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आईचे नाव नोंदवावे लागले.
दहावीतही मुलीच...
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही दहावीच्या निकालात मुलींनी आघाडी घेतली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.१० टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७६.४१ टक्के आहे. परभणी जिल्ह्यातून ९४६६ मुलींनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ९ हजार ३७९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. ७ हजार ७७९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर १३ हजार ६४९ मुलांनी परीक्षा अर्ज भरले. त्यापैकी १३ हजार ४४० मुलांनी परीक्षा दिली. १० हजार २७० मुले उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल बऱ्यापैकी आहेत. निकाल घोषित झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. पेढे वाटून पालकांनी देखील आनंद व्यक्त केला.
विद्यार्थी नेटकॅफेकडे
मंगळवारी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेकडे धाव घ्यावी लागली. शहरातील विश्वशांती ज्ञानपीठ यासह अन्य संस्थांनी मोफत निकाल पाहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळ या ठिकाणी निकालासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

Web Title: Fall to the exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.