बनावट कर्ज मंजुरी पत्र देऊन चेरी कॉर्पोरेशनला लावला चुना
By | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:59+5:302020-11-28T04:04:59+5:30
ग्राहक सूरज सुनील साळवे (रा. मिलकॉर्नर), शफिक पठाण रशीब पठाण (रा. अमरावती, ता. फुलंब्री) आणि फायनान्स कंपनीचा सेल्स ...
ग्राहक सूरज सुनील साळवे (रा. मिलकॉर्नर), शफिक पठाण रशीब पठाण (रा. अमरावती, ता. फुलंब्री) आणि फायनान्स कंपनीचा सेल्स मॅनेजर किशोर नायक, ब्रँच मॅनेजर शिवराज मोरे, झोनल मॅनेजर शीतल जैन, क्लस्टर मॅनेजर प्रणव नायक आणि प्रतिनिधी विजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार अनिता मनीष दंडगव्हाळ यांचे कॅनॉटमध्ये मोटारसायकल विक्रीचे चेरी कॉर्पोरेशन नावाचे दालन आहे. आरोपी वाघमारे हा फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी तेथे काम करतो. गणेश डोके हा काही महिन्यांपूर्वी सूरज साळवे नावाने मोटारसायकल खरेदीसाठी आला. याबाबतची कागदपत्रे सादर करून त्याने मोटारसायकल पसंत केली. तेव्हा तेथे असलेल्या वाघमारेने साळवे याला मोटारसायकल खरेदी करण्यासाठी त्याच्या फायनान्स कंपनीकडून १ लाख ३३ हजार २१ रुपये कर्ज मंजूर केल्याचे पत्र सादर केले. यानंतर तक्रारदार यांनी साळवेकडून २० हजार रुपये घेऊन आरटीओकडून त्याच्या गाडीची नोंदणी करून दिली. गाडी घेऊन तो निघून गेला. फायनान्स कंपनीने मात्र तक्रारदार यांना कर्ज मंजुरी पत्राप्रमाणे रक्कम दिली नाही. अशाच प्रकारे शफिक पठाण यांनाही दुचाकी खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपनीने ८० हजार रुपये कर्ज मंजूर केले. हे पत्र तक्रारदार यांच्याकडे जमा करताना आरोपी वाघमारे याने त्यावर खाडाखोड केली. पठाण यांना १ लाख ६१ हजार ४२६ रुपये कर्ज मंजूर केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात मात्र तक्रारदार यांना एक रुपयाही दिला नाही. हा प्रकार समोर येताच तक्रारदार यांनी सिडको ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
चौकट
कर्जाची आरटीओकडे नोंद
आरोपीने सूरज साळवे आणि शफिक पठाण यांच्या मोटारसायकलची आरटीओकडे नोंदणी करताना फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे नमूद आहे; परंतु ही रक्कम त्या कंपनीने दुचाकी वितरक यांना दिली नाही. केवळ आरटीओकडे नोंदणी करण्याचा खर्च देऊन ते दुचाकी वापरत आहेत.