हार-तुरे नको! ‘एक वही, एक पेन’ द्या; फॅम ग्रुपचा महानिर्वाण दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 06:04 PM2017-12-06T18:04:33+5:302017-12-06T19:25:20+5:30
महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडियावर तयार झालेल्या ग्रुपने ‘एक वही, एक पेन’ हा अत्यंत्य स्तुस्त्य उपक्रम सुरू केला.
औरंगाबाद : महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडियावर तयार झालेल्या ग्रुपने ‘एक वही, एक पेन’ हा अत्यंत्य स्तुस्त्य उपक्रम सुरू केला.
तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हार-तुरे खरेदी करण्याऐवजी त्या पैशातून वह्या-पेन दान करण्याचे आवाहन लोकांना करण्यात येते. त्यानुसार डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनानिमित्त बुधवारी भडकल गेट चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ ‘फॅम’ ग्रुपतर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये हजारोंच्या संख्येने वह्या-पेन जमा झाले.
लोकांनी दान केलेल्या या वह्या-पेन सावित्रीबाई फुले जयंतीला गोरगरीब, गरजवंत, आदीवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार. ‘बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्यांना घालण्यात येणारे हारांचे पुढे निर्माल्यच होतात. त्याऐवजी त्या पैशातून गरीब मुलांसाठी वह्या-पेन दिले तर बाबासाहेबांनी दाखविलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना मदत होईल. हीच तर बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल’, असे स्टॉलवरील स्वयंसेवकांनी सांगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकदेखील सकाळपासून आपापल्या परीने वह्या-पेन दान करत होते.
‘इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा शिक्षणाला हातभार लागेल असे साहित्य दान करणे कधीही चांगले. हा मुद्दा घेऊन आम्ही सुरुवात केली आणि लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, असे फॅम ग्रुपने सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज सुकाळे, दौलत सिरसवाल, सचिन औचरमल, मनीष नरवडे, शैलेश चाबुकस्वार, असित सरवदे, शशिकांत कांबळे, विश्वजीत करंजीकर आदींसह शेकडो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
एक लाख वह्या-पेन!
या वर्षी महाराष्ट्र व छत्तीसगड मिळून एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये ‘एक वही, एक पेन’ हा उपक्रम राबविला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत लोकांमध्ये जागृती पसरविण्यात येते. लोकांचाही उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षी एकू ण ८४ हजार व'ा जमा झाल्या होत्या. यावर्षी एक लाख व'ा जमा होतील अशी ग्रुपला आशा आहे. या ग्रुपमध्ये स्वयंस्फूर्तीने काम करणारी सर्व तरुण मंडळी आहे. आपापल्या नोक-या-व्यवसाय सांभाळून समाजसेवेचे काम ते करतात.