४८ आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:18 AM2018-01-04T00:18:44+5:302018-01-04T00:18:47+5:30
जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत. मराठवाडा २०१२ पासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई झाली. शेतीचे उत्पन्नही घटले. परिणामी शेतक-यांवरील कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यातून आत्महत्यांचे सत्र वाढले.
जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १३८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक २९ आत्महत्या या पैठण तालुक्यात झाल्या. सिल्लोडमध्ये २० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. औरंगाबाद तालुक्यात ११, फुलंब्री १५, सोयगाव १३, कन्नड १९, वैजापूर १७, गंगापूर ८ आणि खुलताबाद तालुक्यात ६ शेतकºयांनी वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १३८ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी आत्महत्या केलेल्या ९० शेतकºयांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात आली आहे. २८ आत्महत्यांची प्रकरणे मदतीस अपात्र ठरवून मदत नाकारण्यात आली आहे. २० प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील पाच वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा आकडा
वर्ष आत्महत्या मदत अपात्र
२०१३ ४ ४ ००
२०१४ ५६ ४१ १५
२०१५ १४४ १०६ ३८
२०१६ १५१ १११ ४०
२०१७ १३८ ९० २८
एकूण ४९३ ३५२ १२१