दोन वर्षांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ७ जणांना १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:06+5:302020-12-17T04:33:06+5:30

संजय बाळासाहेब ठोंबरे, संजयची पत्नी इंदूबाई ठोंबरे, मुलगा सचिन ठोंबरे आणि नितीन ठोंबरे (सर्व. रा. माजी सैनिक कॉलनी, ...

Family charged with bribery of Rs 15 lakh to 7 persons for double return in two years | दोन वर्षांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ७ जणांना १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबावर गुन्हा

दोन वर्षांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ७ जणांना १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबावर गुन्हा

googlenewsNext

संजय बाळासाहेब ठोंबरे, संजयची पत्नी इंदूबाई ठोंबरे, मुलगा सचिन ठोंबरे आणि नितीन ठोंबरे (सर्व. रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव, मूळ रा. दिदृड, ता. माजलगाव, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रेखा भगवान गायकवाड (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) यांचे पती केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात जुनी ओळख आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपी पती-पत्नी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा पिग्मी व्यवसाय करतो. त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत दुप्पट परतावा मिळेल, असे सांगितले. ही बाब त्यांनी पटवून सांगितली आणि पैशाची हमी दिली. यामुळे तक्रारदार यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी २ लाख १६ हजार रुपये गुंतवणूक केले. त्यांच्याप्रमाणेच शुभम शंकर घोडके यांनी ३ लाख ६ हजार रुपये, नंदा संभाजी गजले यांनी २ लाख १६ हजार रुपये, मथुरा भिका घुगे यांनी २ लाख १६ हजार, हमिदा आमिर खान पठाण (मनीषा कॉलनी, वाळूज) यांनी २ लाख १६ हजार, हरिदास नामदेव पवार (फिरदोस गार्डन) यांनी २ लाख १६ हजार रुपये आणि लता वसंत गवंदे यांनी १ लाख ८ हजार रुपये गुंतवणूक केली. तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारांची मुदत मार्च महिन्यात समाप्त झाली. यामुळे त्यांनी ठोंबरे कुटुंबाकडे दुप्पट रकमेची मागणी केली.

तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्या कुटुंबाला कोरोना झाल्याचे कारण सांगून पैसे नंतर देतो, असे सांगितले. यानंतर ते गावी दिदृडला निघून गेले होते.

चौकट =================

आरोपीने गुंतवणूकदारांना धमकावले

तक्रारदार आणि गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात ठोंबरेचे गाव गाठले असता आरोपी संजय हा घरी नव्हता. आरोपी सचिन आणि नितीन यांनी त्यांनाच माझ्या वडिलांचेच तुमच्याकडे पैसे आहेत, असा कांगावा केला. तुम्ही येथून निघून जा, असे धमकावले. यानंतर तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठून आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली. या अर्जाची सखोल चौकशी करून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. भागिले करीत आहेत.

Web Title: Family charged with bribery of Rs 15 lakh to 7 persons for double return in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.