भाग्यश्री योजनेला कुटुंब नियोजन प्रमाणपत्राचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:43 AM2017-09-10T00:43:54+5:302017-09-10T00:43:54+5:30

मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावा, मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, बालविवाहास आळा बसावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे.

 Family planning certificate compalsary for Bhagyashree Yojana | भाग्यश्री योजनेला कुटुंब नियोजन प्रमाणपत्राचा अडसर

भाग्यश्री योजनेला कुटुंब नियोजन प्रमाणपत्राचा अडसर

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावा, मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, बालविवाहास आळा बसावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आतापर्यंत एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, स्त्री भू्रणहत्या रोखणे या उद्देशाने शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने २०१४ मध्ये सुकन्या योजना सुरू केली.
१ आॅगस्ट २०१७ पासून महिला व बालकल्याण विभागाने सुकन्या योजनेचे विलिनीकरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत केले आहे. सुधारित योजनेनुसार पात्र लाभार्थी कुटुंबाला मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षी शासनाकडून बँक खात्यामध्ये ५० हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी दोन किंवा एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करायला हवी, ही महत्त्वाची अट आहे. तीन अपत्ये असणाºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पहिली मुलगी २०१४ नंतर जन्मलेली असावी.
त्या पूर्वी जन्मलेल्या मुलीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही. मात्र, दुसºया प्रसुतीस जुळ्या मुली झाल्यास योजनेस पात्र राहणार आहेत.
दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रस्ताव दाखल करता येणार आहे. मात्र जनजागृतीचा अभाव व गुंतागुंतीच्या निकषांमुळे योजनेबाबत पालकांची भूमिका उदासीन आहे.
योजनेबाबत तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी एस.डी. लोंढे यांनी सांगितले.

Web Title:  Family planning certificate compalsary for Bhagyashree Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.