कुटुंबाला आता चोवीस ऐवजी ४ लिटर रॉकेल !
By Admin | Published: March 18, 2016 01:25 AM2016-03-18T01:25:03+5:302016-03-18T01:54:27+5:30
उस्मानाबाद : गॅसधारक नसणाऱ्या कुटुंबांना रॉकेल पुरवठा केले जाते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे परिमाण आहे. हे परिणाम शासनाकडून रद्द करण्यात आले आहे
उस्मानाबाद : गॅसधारक नसणाऱ्या कुटुंबांना रॉकेल पुरवठा केले जाते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे परिमाण आहे. हे परिणाम शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार आता शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबाला प्रत्येकी ४ लिटर एवढेच रॉकेल मिळणार आहे. पूर्वी शहरासाठी प्रति प्रतिकुटुंब २४ तर ग्रामीण भागासाठी प्रतिकुटुंब १५ लिटर एवढे परिमाण मंजूर होते.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता शासनाने १९९७ वितरण परिमाण निश्चित केले आहे. सदरील परिमाणामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत अल्याचे सांगत या दोन्ही भागासाठी समान परिमाण निश्चित करण्यात यावे, अशा अशयाची याचिका आदर्श बाल विकास महिला मंडळाने नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. त्यावर न्यायालयाने केरोसीनचे समान वाटप करण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार २००१ मध्ये शहरी तसेच ग्रामीण भागासाठी एकच परिणाम जाहीर करून अंमलबजावणी केली. या परिणामास विरोध झाल्यानंतर पुन्हा २००१ पूर्वीच्याच परिमाणानुसार वाटप सुरू केले. या परिमाणाविरूद्ध नागपूर खंडपीठात पुन्हा जनहित याचिका दाखल झाली. त्यावर न्यायालयाने केरोसीन वाटपाचे सुधारित धोरण करण्याबाबद आदेशित केले होते. त्यानुसार शासनाकडून जुलै २०१५ मध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकसमान परिमाण जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणीही येत्या काही महिन्यात सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शिधापरित्रकेवर व्यक्तींची संख्या एक एवढी असेल तर २ लिटर, दोन व्यक्ती असतील तर ३ लिटर आणि तीन वा त्याहून अधिक व्यक्ती असल्यास ४ लिटर रॉकेल मिळणार आहे. जुन्या केरोसीन वितरण परिमाणानुसार शहरासाठी २४ तर ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १५ लिटर रॉकेल मंजूर होते. (प्रतिनिधी)