शुलीभंजन येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:20 PM2019-08-19T14:20:48+5:302019-08-19T14:22:12+5:30

दोन वर्षांपासून नापिकी आणि कर्जबाजारीपणास त्रस्त

Farmer commits suicide after consolidating debt at Shulibhanjan | शुलीभंजन येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शुलीभंजन येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) : येथून जवळच असलेल्या शुलीभंजन येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून सोमवारी (दि.१९ ) सकाळी राहत्याघरी गळफास घेऊन  आत्महत्या केली. भगवान आसाराम फुलारे (52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

फुलारे दोन वर्षापासूनची नापिकी व कर्जबाजारीपणाला वैतागले होते. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रूपये तर बँकेचे शेतीकर्ज साडेतीन लाख रूपये त्याचबरोबर इतरांची काही  देणी होती. लोकांचा पैशांसाठी सतत तगादा होत असल्याने आज सोमवारी सकाळी त्यांनी राहत्या घराच्या छताला गळफास घेवून आपले जीवन संपविले. तलाठी डी.पी. गोरे, पोलीस जमादार यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी शुलीभंजन येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide after consolidating debt at Shulibhanjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.