कर्जास कंटाळून शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या
By Admin | Published: July 10, 2017 03:19 PM2017-07-10T15:19:25+5:302017-07-10T15:19:25+5:30
वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारी पणाला कंठाळून पहाटे राहत्त्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.
>
ऑन लाईन लोकमत
बीड : केज तालुक्यातील उंदरी येथील वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य विक्रम गंगाराम ठोंबरे ( 59 वर्षे ) व त्यांची पत्नी जलसाबाई ( 55 वर्षे) यांनी कर्जबाजारी पणाला कंठाळून पहाटे राहत्त्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
विक्रम ठोंबरे यांना 6 एकर कोरडवाहु जमीन होती. चालु हंगामात शेतीत पेरणी केली होती परंतु पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणी लागणार की काय या विवंचनेत ते होते .या दांम्पत्याकडे सेवा सहकारी सोसायटीचे आणि धारूर येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या शाखेचे कर्ज आहे .
या वर्षी शेती नाही पिकली तर हे कर्ज कसे फरतफेड, नातीच्या लग्नाचा खर्च कसा करायचा या विचारात ते असत. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान विक्रम ठोंबरे यांनी राहत्या घरा समोरील शेवग्याच्या झाडाला तर जलसाबाई विक्रम ठोंबरे यांनी घराच्या आडूला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे आणि जमादार एस. बी. वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवीण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक थोरात यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केले. त्यांच्या पश्च्यात 2 विवाहीत मुले एक विवाहीत मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.