धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन परताना शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 01:44 PM2021-08-17T13:44:43+5:302021-08-17T13:45:42+5:30
दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त करंजखेड येथील काही शेतकरी धारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते
करंजखेड ( औरंगाबाद ) : दुसऱ्या श्रावण सोमवारी धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना करंजखेड येथे सोमवारी सायंकाळी घडली. पोपट गोपाळा पवार ( ५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या एक महिन्यापासून परिसरात पावसाने दडी मारली आहे. शेतातील मशागत कामेही पूर्ण झाली आहेत. यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त करंजखेड येथील शेतकरी पोपट गोपाळा पवार मित्रांसोबत धारेश्वर येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले. कठीण रस्तापार पार करून धारेश्वर येथे सर्वजण पोहचले. येथे शिवाची मनोभावे पुंजन केले. काही वेळाने पवार डोंगर चढून वर आले. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कन्नड येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , दोन मुली, जावाई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.