शेतकरी, ऊसतोड मजुराची आत्महत्या
By Admin | Published: September 10, 2015 12:08 AM2015-09-10T00:08:50+5:302015-09-10T00:33:46+5:30
गेवराई/सिरसाळा : : गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तर परळी तालुक्यातील एका ऊसतोड मजुराने साखर कारखान्याने उचल दिली नसल्याच्या कारणावरुन
गेवराई/सिरसाळा : : गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तर परळी तालुक्यातील एका ऊसतोड मजुराने साखर कारखान्याने उचल दिली नसल्याच्या कारणावरुन आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी समोर आल्या आहेत.
सततची नापिकी यावर्षी कोणत्या कारखान्याने उचल ही दिली नाही सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या कारणांमुळे अल्प भू धारक शेतकरी बाळु रामिकशन खडके (वय २९ रा. मलनाथपुर. ता परळी) असलेल्या उसतोड मजुरांने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्च्यात पत्नी आई तिन भाऊ असा परिवार आहे. ६ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.
दुसरी आत्महत्या गेवराई तालुक्यातील तरटेवाडी येथे घडली.
तरटेवाडी येथील शेतकरी गोविंद किसन नरुटे (वय ७०) यांनी नापिकीव कर्जाला कंटाळून बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास विषरीद्रव पिऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्ज होते. गेल्या चार दिवसापासून ते निघुन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)