शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:23 AM2018-08-03T00:23:43+5:302018-08-03T00:26:05+5:30
मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.
आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.
आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.
राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.
प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप
गणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणार