शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन !

By Admin | Published: March 19, 2017 11:39 PM2017-03-19T23:39:36+5:302017-03-19T23:44:50+5:30

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले.

Farmer Organization's Food Stop Movement! | शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन !

शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन !

googlenewsNext

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले. संघटनेच्या वतीने आयोजित अन्नत्याग उपोषण सांगतेप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते.
१९ मार्च १९८६ रोजी धुळे जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नीने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहिली शेतकरी आत्महत्या केली. त्या दिवसाचे स्मरण म्हणून संघटनेच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन केल्याचे कदम यांनी सांगितले. करपे यांनी त्यावेळी नापिकी व शासनाचे शेतकऱ्यांबाबत असलेल्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले होते. मात्र गत ३१ वर्षांतही हा प्रकार थांबला नाही. सकाळी दहा ते पाच यावेळेत अन्नत्याग केला. त्यानंतर सर्व पदाधिकारी गांधी चमन भागात येऊन उपोषणाची सांगता केली.
महिला प्रदेशाध्याक्षा गीता खांडेभराड, बाबूराव गोल्डे, केशवराव मदन, ऋषींदर डोंगरे, रेणुका चोखनफळे, तात्यासाहेब भानुसे, लक्ष्मण कावळे, रमेश खांडेभराड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer Organization's Food Stop Movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.