चाळीमध्ये कांदा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:05 AM2021-05-05T04:05:16+5:302021-05-05T04:05:16+5:30

यंदा कांदा लागवडीसाठी अनेक कंपन्यांचे बोगस बियाणे बाजारात आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बियाणे खरेदीसाठी अव्वा ते सव्वा रक्कम ...

Farmers almost start filling onions in the chalice | चाळीमध्ये कांदा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू

चाळीमध्ये कांदा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू

googlenewsNext

यंदा कांदा लागवडीसाठी अनेक कंपन्यांचे बोगस बियाणे बाजारात आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बियाणे खरेदीसाठी अव्वा ते सव्वा रक्कम मोजावी लागली होती. कांद्यामध्ये डोगळा कांदा निकाला. बाजारात डोगळ्या कांद्यामुळे दर्जेदार कांदा मालाचे प्रमाण कमी झाल्याने उत्पन्न घटले आहे. एकरी १८० ते २०० क्विंटल कांदा निघणे अपेक्षित होते. मात्र, यंदा एकरी ८० ते १२० क्विंटल कांदा निघाला आहे. सरासरी कांद्याला बाजारात ३०० रुपयांपासून ते १२०० रुपये क्विंटल बाजारात भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान २५०० रुपये क्विंटल तरी भाव मिळणे अपेक्षित आहे. खर्चाच्या मानाने भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चाळीत कांदा भरू लागले आहेत. भाववाढीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांची ही भयावह परिस्थिती पाहता शासनाकडून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Farmers almost start filling onions in the chalice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.