शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देणार; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:37 PM2022-12-03T18:37:15+5:302022-12-03T18:41:26+5:30

आम्ही कमी खर्चाचे ड्रोन देखील तयार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

Farmers' children will be trained to fly drones; Announcement by Agriculture Minister Abdul Sattar | शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देणार; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देणार; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

googlenewsNext

वीज बिल कापल्याने शेतकरी संतप्त आहे. मान्य आहे, आमचे आदेश स्पष्ट आहे. तरी शेतकरी बांधवाना विनंती आहे, विमा अनुदान मिळाल्यावर किमान १ वीज बिल भरावे, असं विनंती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच यापुढे उपग्रहाच्या माध्यमातून पंचनामे करू आणि त्यावर मदत केली जाईल. ही प्रणाली येत्या काळात लवकरच सुरू होईल. पारदर्शकता येईल, पीक-विमा कंपनी आणि सरकार कुणालाच अडचण येणार नाही, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देणार असल्याची घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली. ड्रोनद्वारे फवारणी होईल. गावात तरुणांचे मंडळ मिळून ड्रोन घेऊ शकतील. राहुरी विद्यापीठात हे ट्रेनिंग होईल. ड्रोन किंमत अंतिम झाल्यावर त्याला सबसिडी देण्यात येईल. आम्ही कमी खर्चाचे ड्रोन देखील तयार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.   

४ कृषी विद्यापीठ आणि राज्यातील कृषी विभागाच्या सर्व संस्था एकत्र येईल सिल्लोडमध्ये ५ दिवसीय महाकृषी परदर्शन भरवत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू, अडचणी दूर करू, शास्त्रज्ञा येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करु, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

Web Title: Farmers' children will be trained to fly drones; Announcement by Agriculture Minister Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.