सिडकोविरोधात शेतकरी, नागरिक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:05 PM2019-03-08T21:05:12+5:302019-03-08T21:05:30+5:30
तीसगाव वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शेतकरी व नागरिक सिडकोविरोधात एकवटले आहेत. तीसगाव वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिडकोने निवासी क्षेत्र विकसित करताना महानगरातील १८ गावांतील शेतकऱ्यांच्या २५ टक्के जमिनी संपादित केल्या. यावेळी सिडकोने शेतकऱ्यांना पर्यायी जमिन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू अनेक शेतकऱ्यांना अजून जमिनीचा मोबदला व पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत. विशेष म्हणजे कागदोपत्री दिलेल्या जमिनीचा ताबा नसतानाही शेतकºयांना कर आकारणी लावण्यात आली आहे.
दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे शेतकºयांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून सोमवारी सिडको वाळूज कार्यालयावर विविध मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कृती समितीचे अंजन साळवे, कमलसिंग सूर्यवंशी, भागीनाथ साळे, रामचंद्र कसुरे, ईश्वरसिंग तरैय्यावाले, भरतसिंग सलामपुरे, किशो म्हस्के, अनिल पनबिसरे, सुरेश फुलारे, भिमराव प्रधान आदींनी केले आहे.