शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

By | Published: December 5, 2020 04:03 AM2020-12-05T04:03:34+5:302020-12-05T04:03:34+5:30

आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन ...

Farmers crossed the border, filed a petition in the Supreme Court | शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

googlenewsNext

आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सीकरी सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घरण्यांना भाजप विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.

सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांना संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करून शेतकऱ्यांना थांबवावे लागले. बदरपूर सीमेवर शेतकरी रस्त्यावरच धरणे देऊन बसले आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी (एमएसपी) स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली. सरकारने ऐकले नाही तर २६ जानेवारी रोजी राजपथवर शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहभागी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध वर्गांतील लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत. करनाल येथील एका नवरदेवाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलिशान कारचा त्याग करीत ट्रॅक्टरवर मंडपात पोहोचला. नवरदेव म्हणाला, आम्ही आता शहरात स्थायी झालो असलो तरी आम्ही मूलत: शेतकरी आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच ट्रॅक्टरवरून वरात काढली.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली तसेच हरियाणाच्या सिंधू सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राज्याला उत्तर प्रदेश तसेच हरियाणा सोबत जोडणाऱ्या मार्गांना बंद केले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता आंदोलक शेतकऱ्यांना सिंधू बॉर्डरवरून तात्काळ हटविण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिल्लीचे वकील ओम प्रकाश परिहार यांनी ही याचिका दाखल केली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग २४ बंद केला होता. काही काळ या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.

..................

Web Title: Farmers crossed the border, filed a petition in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.