लाडसावंगीत रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:37+5:302021-05-12T04:04:37+5:30
पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. मागील हंगामात रासायनिक खते व ...
पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. मागील हंगामात रासायनिक खते व युरिया खतांची कृत्रिम टंचाई जाणवली होती. यंदा धावपळ होऊ नये यासाठी शेतकरी आतापासूनच तयारीला लागले आहेत. तसेच नंतर रासायनिक खतांचे दर वाढतील अशी चर्चा सुरू झाल्याने शेतकरी आतापासूनच खरेदी करण्याच्या मागे लागले आहेत.
कोट....
दोन वर्षांच्या सरासरीनुसार लागणारी रासायनिक खते आमच्या संस्थेने बुक करून ठेवले आहेत. सध्या सर्व खते उपलब्ध असून टंचाई जाणवणार नाही. खत टंचाई, दरवाढ या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.
-अंकुश शेळके, संचालक, सेवा सोसायटी लाडसावंगी.
फोटो : लाडसावंगी येथील सेवा साेसायटीसमोर रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.
110521\img_20210511_111431.jpg
लाडसावंगी येथील सोसायटी मध्ये रासायनिक खते खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी