तोडलेली वीज जोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:03 AM2021-02-23T04:03:57+5:302021-02-23T04:03:57+5:30
वीज कापली जात असताना ज्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. ते बील भरत आहेत. मात्र, ज्यांचा हंगाम निघून ...
वीज कापली जात असताना ज्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. ते बील भरत आहेत. मात्र, ज्यांचा हंगाम निघून गेला, ते पाठ फिरवीत आहेत. संपूर्ण बील भरल्याशिवाय महावितरण वीज जोडणी देत नाही, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी त्यांनी वीज जोडणी करण्याची विनंती शनिवारी कनिष्ठ अभियंता निकम यांचेकडे केली. तेव्हा निकम यांनी शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेंतर्गत रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहकाने आपल्या कृषी पंपावर कमीत कमी ५००० रुपये तरी भरावे, असे आवाहन निकम यांनी केले. यावेळी रघुनाथ कदम, डॉ. संजय जामकर, संजय बनसोड, दिलीप सराफ, श्रीरंग मोरे, संतोष दिवटे, एकनाथ तायडे, योगेश कदम, बाबूलाल निंभोरे, श्रीराम डफळ, डॉ. वडोडे आदींची उपस्थिती होती.