जिल्हा बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:04 AM2021-03-23T04:04:27+5:302021-03-23T04:04:27+5:30
सिल्लोड : जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ...
सिल्लोड : जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार, कृ.उ.बा. समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, सोयगावच्या सुरेखा प्रभाकर काळे यांनी विजय मिळविला आहे. विजयानंतर सिल्लोडच्या सेना भवनासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला.
शेतमाल प्रक्रिया मतदार संघातून अब्दुल सत्तार यांनी ४० पैकी ३३, सोसायटी मतदार संघातून गाढे यांनी ८४ पैकी ६३ आणि सोयगावच्या सुरेखा काळे यांनी सोसायटी मतदार संघातून ३४ पैकी २२ मते घेऊन विजय मिळविला. यावेळी डॉ. मॅचिंद्र पाखरे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, युवा सेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, नगरसेवक शंकरराव खांडवे, रामसेट कटारिया, मतीन देशमुख, सत्तार हुसेन, रवी रासने, फहीम पठाण, सुशील गोसावी, संतोष धाडगे, शेख शमीम आदींची उपस्थिती होती.
फोटो : सिल्लोडमध्ये विजयी जल्लोष साजरा करताना शिवसेना पदाधिकारी.