शेतकऱ्यांची जागरण, त्रासातून मुक्ती; कुसुम सोलार योजना म्हणजे दुप्पट उत्पन्नाची हमी

By साहेबराव हिवराळे | Published: June 24, 2023 07:51 PM2023-06-24T19:51:02+5:302023-06-24T19:51:12+5:30

ज्यांच्याकडे वीजजोडणीच नाही, त्या ठिकाणी कुसुम सोलार योजना अत्यंत फायद्याची

farmers, freedom from Awakening, hardship; Kusum Solar Yojana means double income guarantee | शेतकऱ्यांची जागरण, त्रासातून मुक्ती; कुसुम सोलार योजना म्हणजे दुप्पट उत्पन्नाची हमी

शेतकऱ्यांची जागरण, त्रासातून मुक्ती; कुसुम सोलार योजना म्हणजे दुप्पट उत्पन्नाची हमी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ला कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेंतर्गत पाच लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्क्यांवर अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पाच लाख शेतकऱ्यांना सोलार पंपांसाठी मदत करणार आहे.

अनुदान पुढीलप्रमाणे
पारेषण संलग्न सौर कृषिपंप बसविण्याच्या वेळी ३० टक्के राज्य आणि केंद्र ३० टक्के अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उर्वरित ४० टक्के शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.या अभियानात निर्मिती सौरऊर्जा वीजजोडणी नियमानुसार देण्यात येणार आहे. त्यास महावितरणचेही सहकार्य अपेक्षित आहे.

योजनेचे लाभार्थी
जिल्ह्यात पीएम कुसुम सोलार योजनेचे २,३१७ लाभार्थी असून, एकरी लाखापर्यंतची कमाई त्यांनी सुरू केलेली आहे. वीज, मोटर, इंजिनमध्ये डिझेल टाकून विहिरीतून पाणी काढून पिकांना देणे हे खर्च बंद झाल्याने ही शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच बाब आहे.

वीजपुरवठा नसेल म्हणून हताश होऊ नका...
ज्यांच्याकडे वीजजोडणीच नाही, त्या ठिकाणी कुसुम सोलार योजना अत्यंत फायद्याची असून, निसर्गावर अवलंबून राहण्यापेक्षा बारा महिने पिके घेऊन बागायतदार शेतकरी होण्याची संधी यातून मिळते. पोर्टलवर कुसुम योजनेसाठी अर्ज केल्यास योजनेचा लाभ घेता येतो.
- विनोद शिरसाट, विभागीय सरव्यवस्थापक, महाऊर्जा

Web Title: farmers, freedom from Awakening, hardship; Kusum Solar Yojana means double income guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.