शेतकऱ्यांनी जमीन देऊन निर्माण केले गावविकासाचे मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:32+5:302021-05-23T04:04:32+5:30
शेंद्रा : कुणी रस्त्यासाठी, तर कुणी नाला खोलीकरणासाठी जमीन दिली आणि यातून तब्बल १ कि.मी. लांबीचा रस्ता तयार करण्यात ...
शेंद्रा : कुणी रस्त्यासाठी, तर कुणी नाला खोलीकरणासाठी जमीन दिली आणि यातून तब्बल १ कि.मी. लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. तर नाला खोलीकरणामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढणा असल्याने गाव सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीतून हे विकासाचे वेगळे मॉडेल इतरासंमोर निर्माण केले आहे.
वरूड काजी येथील सोमनाथ माणिकराव पठाडे यांनी रस्ता तयार करण्यासाठी त्यांची जमीन दिली. त्यानंतर भाऊसाहेब अप्पा दांडगे, रावसाहेब पंडितराव दांडगे यांनीही आपली जमीन दिली. तर नाला खोलीकरणासाठी भाऊसाहेब बनसोडे तसेच रामदास तायडे यांनी जमीन दिली २४ तास विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणमधील संबंधित अधिकाऱ्यांनी मदत केली. वाद हाेऊ नये यासाठी इतर शेतकऱ्यांना त्यांनी समजावून सांगितले. त्यामुळे हा रस्ता कुठलाही वाद न होता पूर्ण झाला आणि गावविकासाचे वेगळे मॉडेल त्यांनी इतरांसमाेर तयार केले.
शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी मुरूम, माती विकत घेण्याऐवजी नाल्याचे खोलीकरण करून त्यातील माती रस्त्यासाठी वापरली. याने शेतकऱ्यांचा रस्त्यासोबत पाण्याचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नाल्याच्या खोलीकरणामुळे लाखो लिटर पाणी अडविले जाऊन शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणीपातळी याच हंगामात वाढेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अडचणी संपुष्टात आल्या
रस्ता नसल्याने मालाची वाहतूक तसेच जाण्या येण्यास खूपच त्रास होत असे. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्या अडचणी संपुष्टात आल्या आहेत.
- भाऊसाहेब पठाडे शेतकरी
शेतकऱ्यांचा हातभार लागला
मी शहरात राहतो. मात्र, गावी शेतात नेहमी यावे लागते. आमच्या काकांनी मार्गदर्शन केले आणि सर्व शेतकऱ्यांनी हातभार लावत नेहमीची अडचण दूर केली याचा मनस्वी आनंद आहे.
-कौतिक पठाडे, शेतकरी
दळणवळणाचा प्रश्न मार्गी
नेहमीचा वाहतूक आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता चिखल तुडवायची गरजच पडणार नाही. याने सगळेच शेतकरी खूप आनंदात आहेत.
- सुभाष दांडगे, शेतकरी
कॅप्शन...१) तयार झालेला रास्ता.
२)खोलीकरण केलेला नाला. ३)
सर्व शेतकरी.