शेतकऱ्यांना मिळणार धनादेशाद्वारे मालाचे पैसे
By Admin | Published: November 16, 2016 12:13 AM2016-11-16T00:13:52+5:302016-11-16T00:13:56+5:30
जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे.
जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे. यात बाजार समितीही सुटलेली नाही. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे.
जालना बाजार समितीत भुसार, किरणा, भाजीपाला, कापूस, सोयाबीन, मोसंबी आदी बाजारपेठेत दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. शेकडो शेतकरी दिवसाकाठी विविध धान्ये भुसार बाजारात आणतात. शेतकऱ्यांना माल विक्री केला लगेच पैसे मिळत. मात्र हजार व पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्या त्यासोबचत नवीन चलनाचा तुटवडा भासत आहे. रोख रक्कम शेतकऱ्यांना देणे व्यापाऱ्यांना जिकिरीचे होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची जी काही माल विक्रीची रक्कम आहे ती धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडूनही या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांचा बँकेत खाते असतेच. यामुळे धनादेश दिला म्हणजे काही अडचण येण्याचा प्रश्न नाही. थेट पैसे खात्यात जमा होतात. गत काही दिवसांपासून सोयाबीन व कापसाची आवक होत आहे. सोयाबीनच मंगळवारी ४ हजार १७५ तर मका ४५३८ एवढी आवक इतर शेतीमालाची आवकही बऱ्यापैकी होत आहे.
यामुळे शेतकरीही धनादेश स्वीकारत असल्याचे आडत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समिती यार्डात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस सुरू आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)