गोदाकाठावरील शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:37 AM2019-01-15T00:37:10+5:302019-01-15T00:37:30+5:30
अनधिकृत पाणी उपसा भोवणार : ३५० जणांवर पोलीस कारवाईची टांगती लतवार
गंगापूर : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या ३२ गावांतील ३०० ते ३५० शेतकºयांवर जायकवाडी प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने शेतकºयांनी धसका घेतला आहे.
जायकवाडीच्या जलफुगवट्यातून पाणी उचलण्याची परवानगी नसणाºया शेतकºयांवर सदर कारवाई होणार असून या संदर्भात संबंधित विभागाने मागील महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन शेतकºयांना पाणी प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काही शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली, मात्र अजूनही अनेक शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली नाही. अशा शेतकºयांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली .
सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी पाटबंधारे पैठण विभागांतर्गत येणाºया गंगापूर शाखेतर्फे सदर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी काही शेतकºयांसह पोलीस ठाणे गाठले होते. शेतकºयांनी कारवाईसंदर्भात लगेच निर्णय न घेता अजून एका महिना सवलत द्यावी, या कालावधीत पाणी परवानगी काढून घेऊ, असे सांगून वेळ मागून घेतली. मात्र, विभागाचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शेतकºयांचे म्हणणे...
सध्या कांद्याला बाजारभाव नाही, उसाचे देखील वांधे झाले आहेत. उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. या शिवाय ज्या शेतकºयांचा ऊस गेला, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत पैसे उपलब्ध होणार कसे, या विवंचनेत शेतकरी असतानाच पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे शेतकºयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाकडून सुरुवातीला प्रति कनेक्शन १२०० रूपयांची मागणी करण्यात आली होती. आता मात्र यात वाढ करुन २२०० रूपयांची मागणी करण्यात येत आहे. सदर मागणी अवाजवी असल्याचे येथे शेतकरी देविदास वाघ म्हणाले. यावेळी जामगाव व कायगाव येथील शेतकरी उपस्थित होते. या कारवाईमुळे शेतकरी भांबावले असून संबंधित विभागास शेतकºयांच्या उद्रेकाला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गावात होणार कारवाई
गंगापूर तालुक्यातील जामगाव, नेवरगाव, बगडी, हैबतपूर, ममदापूर, कायगाव, नवाबपूर, गणेशवाडी, अमळनेर, लखमापूर, गळनिंब, आगरवाडगाव, सावखेडा, मांडवा आदींसह ३२ गावातील ३०० ते ३५० शेतकºयाविरोधात कारवाई होणार असल्याने संबंधित विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.