पक्षप्रमुखांकडे मांडल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा..!
By Admin | Published: May 8, 2017 12:15 AM2017-05-08T00:15:09+5:302017-05-08T00:16:24+5:30
जालना : मराठवाडा शिवसंपर्क अभियानास मार्गदर्शन करण्यासाठी औरंगबाद येथे आलेले उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाडा शिवसंपर्क अभियानास मार्गदर्शन करण्यासाठी औरंगबाद येथे आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी मांडली.
यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, भगवान कदम, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, माधवराव कदम, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, सुरेश बोरसे, बाबासाहेब तेलगड, प्रसाद बोराडे आदींची उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत, तूर खरेदी, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आदी समस्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर रविवारी समस्या मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे शिवसंपर्क अभियान दौऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले.
त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील शिवसेनेची मागील दोन वर्षांतील आंदोलन, मोर्चे, धरणे, रास्ता रोको असे विविध आंदोलनांसदर्भात माहिती दिली. सध्या तूर खरेदी विक्र ी केंद्र बंद असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक टंचाईत सापडला आहे. चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदर शेतकरी होरपळून निघाला आहे.
त्यातच शासनाचे हे जुलमी धोरण शेतकरऱ्यांना आणखीनच मेटाकुटीस आणत आहे. या मेटाकुटीपासून शेतकऱ्यांना दूर करण्यासाठी आपण तात्पर प्रयत्न करतो.
यासाठी नेहमीच शेतकरी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहता. गत काही महिन्यांत अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. सरकारचे दुटप्पी धोरण वाढत्या शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला.