भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

By Admin | Published: June 18, 2014 01:14 AM2014-06-18T01:14:30+5:302014-06-18T01:28:17+5:30

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़

Farmers' helicopter with the land development bank | भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

googlenewsNext

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़ दरम्यान, बिलोली, धर्माबाद, उमरी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बिलोलीत पायपीट करावी लागत आहे़ एकाच बँक कर्मचाऱ्यावर भार असून ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत़
शेतकऱ्यांची बँक म्हणून भू-विकास बँक परिचित होती़ पण बुडीत कर्जामुळे बँकेचे दिवाळे निघाले़ सन १९९६ मध्ये बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद झाले़ पीक कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका सरसावल्यामुळे भू-विकास बँकेचे महत्त्व घटले व ही बँक केवळ नावाकरिता उरली़ पण शेती कर्जासाठी या बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नवीन कर्जधारकांना बँकेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़
बिलोली, नायगाव व धर्माबादसह उमरी तालुक्यातील जवळपास २५० गावांसाठी बिलोलीची भू-विकास बँक होती़ परिणामी अशा गावातील शेतकऱ्यांना या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवयक झाले़ १९९६ पासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असले तरी पूर्वी दिलेल्या कर्जासाठी सदरील प्रमाणपत्र आवश्यक आहे़ अशा स्थितीत चार तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे येवून प्रमाणपत्र घ्यावे लागते़ पूर्वी तर येथे रांगाच रांगा लागत़ बँकेचे व्यवहार बंद झाल्याने केवळ एकच कर्मचारी येथे बसून राहतो़ सध्या पीक कर्जासाठी धावपळ सुरू झाली आहे़ अशा स्थितीत प्रमाणपत्र घेण्यासाठी बँकेकडे फिरकावे लागते़
या संदर्भात बँकेत चौकशी केली असता चार तालुक्यातून आजही बाराशे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज थकित आहे़ अशा खातेदारांत बहुसंख्य शेतकरी हयात नाहीत़ पण जमीन, मालमत्ता, शेती वारसा प्रमाणे मालक बदलले आहेत़ काहींनी बँकेचे कर्ज असतानाही शेतीविक्री केली आहे़ परिणामी शेतकऱ्यांना एकदा ना एकदा येथे येवून प्रमाणपत्र घ्यावेच लागते़ चाळीस वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराची कागदोपत्री नोंद येथे आहे़ एखादा शेतकरी संबंधित शेतीचा सातबारा आणला की संपूर्ण नोंदी तपासाव्या लागतात़
मालकांच्या हक्कात बदल झाल्याने बारकाईने पाहणी करावी लागते़ त्यामुळे २ ते ४ दिवस जातात़ बँकेचे व्यवहारच अठरा वर्षापापासून बंद असल्याने आॅनलाईन व्यवहाराचा येथे फायदाच होत नाही़ एकीकडे पीककर्ज, सातबारा आॅनलाईन होताना येथील बंद झालेल्या बँकेत तीच ती जिर्ण कागदपत्रे तपासून अधिकारी वैतागले आहेत़ शेतकरी मात्र गांधीनगरच्या भागात येवून बंद बँकेचा शोध घेवून हैराण होत आहेत़ (वार्ताहर)
आजही बाराशे शेतकरी बँकेचे कर्जदार आहेत़ कर्जावर व्याज लावल्याने रकमेत वाढ झाली आहे़ कर्जदारांचे सातबारे बदलले असल्याने सर्व्हेनंबर व गटनंबर तपासावे लागतात व प्रमाणपत्र द्यावे लागते़ केवळ पीक कर्जाच्या वेळीस गर्दी होते - जी़एल़ पवार, बँक अधिकारी, बिलोली़
चार तालुक्यातील बँकांना बाराशे थकबाकीदारांच्या सर्व्हे नंबरची यादी पाठवावी़ जेणेकरून शेतकऱ्यांना प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता पडणार नाही़ आॅनलाईनवर सर्व्हेनंबरची नोंद झाल्यास आपोआपच सर्व बँकांना यादी कळेल - आबाराव संगनोड, अध्यक्ष, शेतकरी खरेदी विक्री संघ बिलोली

Web Title: Farmers' helicopter with the land development bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.