शेतकºयांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:05 AM2017-08-18T00:05:54+5:302017-08-18T00:05:54+5:30

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकºयांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयासमोर चौथ्या दिवशीही शेतकºयांचे उपोषण सुरूच होते.

Farmers' hunger strike continues on the fourth day | शेतकºयांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

शेतकºयांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकºयांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयासमोर चौथ्या दिवशीही शेतकºयांचे उपोषण सुरूच होते.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विष्णुपुरी येथील शेतकºयांची जमीन १९९२ मध्ये संपादित केली होती. जमीन संपादित करताना शेतकºयांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नाही. जमीन संपादनामुळे येथील शेतकरी व त्यांचे कुटुंबिय बेरोजगार झाले आहेत. त्यांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी १४ आॅगस्ट पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर शेतकºयांची उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनात मोहनराव हंबर्डे, विलासराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, प्रविण हंबर्डे, काळबा हंबर्डे, प्रभाकर हंबर्डे आदी सहभागी झाले़

Web Title: Farmers' hunger strike continues on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.